सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामासाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे बाळा जठार यांनी जनतेच्या वतीने मानले आभार ….

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन – २०२२-२३ क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत तसेच इतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रमा अंतर्गत खारेपाटण विभागातील विविध अत्यावश्यक सोयी सुविधा व विकासकामांसाठी तब्बल १ कोटी ४० लाख रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाला असल्याचे माहिती खारेपाटण विभागाचे माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
“खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात मागील काही वर्षात पालकमंत्री आमचा पक्षाचा नसल्याने विकास कामे ज्या गतीने व्हायला पाहिजे होती.ती झाली नव्हती त्यामुळे येथील मतदारराजा विकासापासून वंचित होता.
मात्र महारष्ट्र राज्यातील सतांतरा नंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मा.रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर काही महिन्याच्या आताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी मोठा निधी मंजूर केला असून यामध्ये खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावांच्या विविध विकास कामांसाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये एवढा मोठा निधी मंजूर केला असल्याने भारतीय जनता पक्ष खारेपाटण विभागाच्या वतीने व येथील जनतेच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे याचे जाहीर आभार व्यक्त करत असल्याचे श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी यावेळी सांगितले.”
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन -२०२२-२३ क वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रम अंतर्गत खारेपाटण विभगासाठी मंजूर झालेली विकास कामे पुढील प्रमाणे –
१.कुरगवणे पशिम ते भंडारवाडी शाळेकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकण करणे – (५ लाख रुपये)
२.खारेपाटण रामेश्वर नगर कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे – (८लाख रुपये)
३.मुंबई – गोवा हायवे ते नडगिवे गांगेश्र्वर मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (८लाख रुपये)
४.मोंजे वायंगणी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे – (१२ लाख रुपये)
५. तळेरे वाघाचीवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (५लाख रुपये)
६.खारेपाटण श्री देव कालभैरव मंदिर मार्गे बाजारपेठ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (४ लाख रुपये)
७.खारेपाटण पोस्ट ऑफिस ते जि.प. केंद्र शाळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (४ लाख रुपये)
८.खारेपाटण कोडवाडी पाण्याची टाकी ते श्री खांडेकर घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (४ लाख रुपये)
९.रा.म.क्रं.१७७ तळेरे दत्तमंदिर चाफडेवाडी कासार्डे मार्गे ग्रा.मा.६५ खडीकरण व डांबरीकरण करणे – (१० लाख रुपये)
१०.खारेपाटण चंद्रप्रभू जैन मंदिर रस्ता ग्रा.मा.६ खडीकरण व डांबरीकरण करणे -(१० लाख रुपये)
११. शिडवणे पाष्टेवाडी रस्ता ग्रा.मा.३८ खडीकरण व डांबरीकरण करणे – (१५ लाख रुपये)
१२.प्र.जी.मा.१ते वायंगणी गावठण वाडी,ताम्हणकरवाडी मार्ग ग्रा.मा.१७ खडीकरण व डांबरीकरण करणे – (१० लाख रुपये)
१३. रा.मा.१७ ते वारगाव मांडवकर वाडी,धावडेवाडी मार्ग ग्रा.मा.३६ खडीकरण व डांबरीकरण करणे – (१५ लाख रुपये)
१४.मौजे वायंगणी – खारेपाटण, धालवली मुख्य रस्ता इ.जि.मा.१ ते ग्रा.मा.२७ ताम्हणकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – (१५ लाख रुपये)
१५. नडगिवे – कुरंगवणे – शेर्पे – चिंचवली मार्ग कि.मी.७/८००ते ९/०० मध्ये मजबुतीकरण करणे इ. जि.मा.क्रं.३ (१५ लाख रुपये)
वरील सर्व कामे खारेपाटण विभागासाठी मंजूर झाली असून अजून ही विकास कामे येत्या काही दिवसात केली जाणार असल्याचे रवींद्र जठार यांनी यावेळी सागितले.

अस्मिता गिडाळे / खारेपाटण

error: Content is protected !!