आंदुर्ले येथे ४ एप्रिलपासून श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापनदिन सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : श्री गोपाळकृष्ण मंदिर, आंदुर्ले व प. पू. संत सद्गुरु श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास यांचा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि ४ ते ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
यानिमित्ताने ४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १० वा. श्री गणेश पूजन, श्रीचे पादुका पूजन, श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक, सकाळी १० ते १२. वा. श्री सत्यनारायण महापूजा (यजमान सौ. व श्री. सदानंद कदम, देवगड) दुपारी १. वा. श्रींची आरती, नैवेद्य, तिर्थप्रसाद,दुपारी ३. वा. फुगडी नृत्य रामेश्वर महिला फुगडी मंडळ, हुमरमळा, सायं. ४ वा. स्थानिकांची सुस्वर भजने, सायं. ७.वा. श्रींची नित्य सांजआरती, ७.३० ते ९.३० वा.सुश्राव्य किर्तन ह.भ.प. सौ. स्नेहलताई पित्रे, डोंबिवली.
शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ७. वा. श्री गणेश आवाहन, श्री गणेश पूजन, श्री गोपाळकृष्णा पूजन, अभिषेक, एकादशण्या, दुपारी १२ वा. श्रींची आरती, नैवेद्य, दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद , ३ ते ५ वा. जगन्नाथ संगीत विद्यालय, कुडाळ प्रस्तुत (पखवाज अलंकार – श्री महेश सावंत व सहकारी) भजनारंग’ सायं.५ ते ७ वा. स्थानिकांची सुस्वर भजने, सायं. ७ वा. श्रींची नित्य सांजआरती, सायं. ७.३० ते ८.३० वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ८.३० ते ९.३० वा. सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरा यांचा नाट्यप्रयोग.
शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. लघु रूद्र – महाराज मठामध्ये, सकाळी ९ ते ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा- गोपाळकृष्ण मंदिरामध्ये, दुपारी १२ वा. श्रींची आरती, तिर्पप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वा. हरीपाठ – विलास रेवंडकर व सहकारी, मुणगी यांचा सायं. ४ ते ५ वा. प. पू. संत नामदेव महाराज भजन मंडळ, सिंधुदुर्ग यांचे सुश्राव्य भजन, सायं. ५ ते ७ वा. स्थानिकांची सुस्वर भजने, सायं. ७ वा. श्रींची नित्य सांजआरती, सायं ७.३० ते ९.३० वा. श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री ९.३० वा . वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत
बुधवार दि. १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद, सायं. ८ वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, पाट यांचा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या भक्तीमय सोहळ्याला उपस्थित राहून श्रीच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा व भक्तीमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. सं. स. श्री नामदेव महाराज सेवक भक्त मंडळ आंदुर्ले, बाळ गोपाळ व आंदुर्ले ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. .
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.