आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
आचरा : आचरा जामडूल येथील समिर पर्शुराम आचरेकर वय ३५ याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील पर्शुराम संभाजी आचरेकर यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत वडीलांनी दिलेल्या जबाबानुसार समिरचे दोन वर्षापासून मानसिक संतूलन बिघडले होते. त्याच्यावर उपचार केले गेले होते. दोन फेब्रुवारी पासून तो आचरा येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. गुरुवारी नेहमी प्रमाणे दैनंदिन कामे आटोपून दुपारी देवघर खोलीत पोटात बर नसल्याने झोपला होता. सायंकाळी पाच वाजता मुले क्लासला यायला झाली म्हणून त्याला उठवायला गेलो असता समिर गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.याबाबत पर्शुराम आचरेकर यांनी ओरडा मारल्यावर लगतच्या माणसांनी धाव घेतली होती. खबर मिळताच घटनास्थळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे,सहाय्यक उपनिरीक्षक महेश देसाई,पोलीस कर्मचारी सौ मिनाक्षी देसाई, मनोज पुजारे,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी ,जिल्हा परीषद सदस्य जेरान फर्नांडिस आदी उपस्थित झाले होते.
अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुकाराम पडवळ करत आहेत. समिर आचरेकर याच्या पश्चात आई, वडील,एक भाऊ,बहिण असा परीवार आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / आचरा