कठोर तपश्चर्येने माणूस देव बनू शकतो हि धारणा घातकच – विजय चौकेकर

सावंतवाडी – आपल्यावर लहानपणापासून असे संस्कार झाले आहेत किंवा आपल्याला सांगितले गेले की एखाद्याने परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी स्वतःला विविध मार्गाने यातना दिल्या , परमेश्वराची कठोर प्रार्थना केली , कठोर भक्ती केली , परमेश्वर प्राप्तीसाठी योग , तप ,साधना केली . सिद्धी प्राप्त होण्यासाठी विविध मार्गाने कठोर तपश्चर्या केली की कालांतराने त्याला सिद्धी प्राप्त होते . आणि अशी एखाद्याला सिद्धी प्राप्त झाली की त्याला भूतकाळातील , वर्तमानकाळातील ,भविष्यकाळतील घटना जाणता येतात . इतरांचे आजार बरे करता येतात .त्याला विविध चमत्कार करता येतात . म्हणजेच कठोर तपश्चर्येने माणूस देव बनू शकतो हि धारणा आपली होते आणि हि धारणाच आपणास घातकच आहे . अशी धारणा झाली की आपण त्याच्यापुढे आपला विवेक गहाण ठेऊन नतमस्तक होतो आणि अशा भोंदू बाबांच्या आहारी जातो . आणि आपले नुकसान करून घेतो . त्यामुळे कठोर तपश्चर्येने माणूस देव बनू शकतो हि धारणाच ठेवणे घातकच आहे .असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सावंतवाडी येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .

 यावेळी त्यांच्यासमवेत विचार मंचावर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस सर लोकमान्य एज्यूकेशनचे समन्वयक डॉ . मिसाळे सर , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डाँ . संजिव लिंगवत सर , सहसचिव संजय खोटलेकर सर ,  विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे सेवानिवृत्त प्रा . भाऊ गोसावी सर , सेवानिवृत्त मुख्याध्यापक कल्याण कदम सर आदी उपस्थित होते .

यावेळी डॉ . संजिव लिंगवत सरांनी विद्यार्थ्यांना मनाचे विविध आजार कि ज्यामुळे देवी अंगात येणे , भूत अंगात येणे घडू शकते त्या विविध आजाराची उदा मॅनिया , स्किझोफ्रेनिया , पॅरानिया , डिप्रेशन , हिस्टेरिया आदी आजार आणि त्यांची लक्षणे सांगून विद्यार्थांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी विवेकवाद आचरणाचे आवाहन केले .

विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती देऊन हा कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते . असे सांगितले .या चळवळीत तरुण मुलांनी सामिल होण्याचे आवाहन हि केले .

यावेळी प्रशालेचे साईप्रसाद पंडित सर , सौ . अस्मिता गवस मॅडम , सौ . मेधा मयेकर मॅडम , शैलेश गावडे सर आदी उपस्थित होते .
प्रास्ताविक साईप्रसाद पंडित सरांनी केले तर आभारप्रदर्शन संजय खोटलेकर यांनी केले प्रशालेच्या शंभर मुलांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला .

error: Content is protected !!