मोबाईल ऍपद्वारे ई – पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी निश्चित : अविशकुमार सोनोने
ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : मोबाईल ऍपद्वारे ई- पीके पाहणी नोंदविण्याचा कालावधी व तलाठी स्तरावरील कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. अशी माहिती प्र.डी.डी.ई.तथा निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.
शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी हंगाम खरीप दि. 15 जून ते 15 ऑक्टोंबर, रब्बीसाठी दि. 16 ऑक्टोंबर ते 15 फेब्रुवारी आणि उन्हाळीसाठी दि. 16 फेब्रुवारी ते 30 एप्रिल राहील.
तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी हंगाम खरीप दि. 16 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेबर, रब्बीसाठी दि. 16 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि उन्हाळीसाठी दि. 1 मे ते 31 मे राहील. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ई-पीक पाहणी अंमलबजावणी कक्ष पुणे यांच्याकडील दिनांक 15 फेब्रुवारी 2023 अन्वये संपूर्ण राज्यात मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येत आहे.
तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंद दुरुस्त करण्यासाठी कालावधी पुढील प्रमाणे आहे. त्या हंगामातील शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करण्यासाठी दिलेला कालावधी तलाठी स्तरावरील पिक पाहणीसाठी दिलेला कालावधी 15 दिवस असा कालावधी आहे.
मंडळ अधिकारी स्तरावरील पीक पाहणी नोंद दुरुस्त करण्यासाठी कालावधी पुढील प्रमाणे आहे. त्या हंगामातील शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करण्यासाठी दिलेला कालावधी तलाठी स्तरावरील पिक पाहणीसाठी दिलेला कालावधी 15 दिवस असा कालावधी आहे.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी.