आमडोस पावनवाडी रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट अंतर्गत ३० लाख रु मंजूर

मालवण तालुक्यातील आमडोस पावनवाडी ग्रा. मा. २९५ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३० लाख रु मंजूर केले असून आज या रस्त्याचे भुमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, भाजप सरपंच सुबोधिनी परब यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभवजी नाईक यांनी मालवण तालुक्यामध्ये विकासाची जबाबदारी आपली असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सामान्य लोकांना काय दिले पाहिजे, त्यांच्या काय अडचणी आहेत यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा सातत्याने करत असतो. जी जी विकास कामे करत आहोत ती आज विकास कामे पूर्ण होत आहेत. यापुढील काळातही अशाच प्रकारे विकास कामे करत राहू. आपण दाखवलेला विश्वासाला या मतदार संघाचा आमदार म्हणून पात्र ठरलो.

संतोष हिवाळेकर पोईप

error: Content is protected !!