लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न ; महिला दिनाचे आयोजन…..
कणकवली – सालाबादप्रमाणे जागतिक महिला दिनाचे औत्सुक्य साधून लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता तेलीआळी कणकवली येथील श्री भवानी सभागृह येथे “महिला दिन” साजरा करण्यात येणार आहे.तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन लावण्यसिंधूचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर व संचालिका सौ.प्रांजल पराडकर,सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अक्षता कांबळी यांनी केले आहे.
8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त यावेळी महिलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.महिला दिनाचे महत्त्व अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या स्त्रियांना प्रोत्साहन देणे,शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे वगैरे उद्देशाने दरवर्षी या संस्था मार्फत महिला दिन उत्साहाने साजरा केला जातो.त्याप्रमाणे यावर्षी 12 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.





