तिलारीच्या पाण्यासाठी सरपंचांचा एल्गार

दोडामार्गमध्ये पत्रकार परिषद; नव्या बदलाची आशा
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाण्यापासून वंचित गावांच्या सरपंचांनी पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे.त्यांचा पुढाकार नव्या बदलाची नांदी ठरण्याची आशा आहे.
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावे अजूनही तिलारीच्या पाण्यापासून वंचित आहे . त्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळा नाईक यांच्या नेतृत्वाखालील सरपंचांनी घेतला. येथील स्नेह रेसिडेन्सी मध्ये पत्रकार परिषद झाली.
तिलारी धरणाचे पाणी माटणे पंचक्रोशीतील झरेबांबर, खोक्रल, उसप, पिकुळे, तळेखोल, विर्डी, आयी, वझरे, माटणे आदी गावांना कालव्याद्वारे मिळावे अशी मागणी आहे;मात्र शासन या मागणीकडे कायमच दुर्लक्ष करत आले आहे.केंद्र शासनाकडून त्यासाठी निधी आल्याची चर्चा आहे;मात्र संबंधित विभाग या भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे . त्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील गावांची कृतीसमिती तयार करण्यात येणार आहे . संबंधित गावचे सरपंच व ग्रामस्थ त्या समितीत असतील. हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा उभारू असा इशारा माजी उपसभापती प.स. दोडामार्ग बाळा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दोडामार्ग येथे दिला.यावेळी लक्ष्मण झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, खोक्रल, सरपंच देवेंद्र शेटकर, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, वझरे गिरोडे, सरपंच सुरेश गवस, माटणे सरपंच महादेव गवस , तळेखोल सरपंच वंदना सावंत, पिकुळे सरपंच आपा गवस उसप माजी सरपंच दिनेश नाईक, उपसरपंच महादेव नाईक तळेखोल उपसरपंच सुनिल गवस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पाण्यासाठी काहीही..
जोपर्यंत गावात पाणी पोचत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत. पाण्यासाठी काहीही करू असा इशाराच सर्व सरपंचांनी दिला.
प्रतिनिधी,कोकण नाऊ,दोडामार्ग





