संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ऑलकेम 2024 संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेजचा रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ फेब्रुवारीला ऑलकेम या कार्यक्रमाचे आयोजन कॉन्फरन्स हॉल मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्र प्राचार्य डॉ ए एन लोखंडे यांच्या हस्ते फित कापून व डॉ एस के पवार डाँ व्ही बी झोडगे , डाँ एम एन जांबळे प्रा पी आर रॉडरिग्ज, प्रा एस जी पाटील, प्रा ए एम कानशिडे, डाँ पी डी जमदाडे प्रा पी एन तळणकर ह्यांच्या उपस्थित करण्यात आले
विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र व त्यातील संधीची माहिती व्हावी संशोधनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ऑलकेम या कार्यक्रमात एव्हरी डे केमिस्ट्री या विषयावर सेमीनार प्रेझेन्टेशन स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये एकूण सहा स्पर्धक संघांनी भाग घेतला त्या मध्ये प्राजक्ता थोरात, हर्षदा परब , कोमल गेडाम, मरीयम पटेल, यज्ञा , वासुदेव सावंत, सृष्टी गवळी व दुर्वा बांदेकर (सर्व प्रथम वर्ष विज्ञान) यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले यात प्राजक्ता थोरात (प्रथम) हर्षदा परब (द्वितीय) तर सृष्टी गवळी व दुर्वा बांदेकर यांना (तृतीय क्रमांक) मिळाला. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ एम एन जांबळे व संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा पी एन तळणकर हे परिक्षक म्हणून लाभले
दुसऱ्या सत्रात क्यूझिकल हा क्वीझ कॉम्पिटीशन कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये एकवीस स्पर्धकांनी भाग घेतला. एकूण तीन फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत फैयाज तालिकोट , सुजन प्रभुखानोलकर प्रथम ,ओंकार आईर , गणेश सामंत द्वितीय तर सेजल पटेल व प्रेरणा कुबल यांनी तृतीय क्रमांक पटकावला . परिक्षक म्हणून डाँ एन पी कांबळे व प्रा ए एम कानशीडे यांनी काम पाहिले .
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा पी आर रॉडरिग्ज, प्रा एस जी पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डाँ एस के पवार , प्र प्राचार्य डाँ ए एन लोखंडे यांनी विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रावणी साळगावकर व तन्वी आजगावकर यांनी तर आभार प्रदर्शन दुर्वा बांदेकर हिने केले
या कार्यक्रमा साठी कमशिप्र मंडळाचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डाँ ए एन लोखंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश दळवी, शुभम गोलम, मंदार कोरगावकर, सौरभ आपटे, भूषण केरकर, गीता गावडे, प्रणिता गावडे, परिणिता केळुसकर, गौरव तेली, गौ रेश तेली, अनिकेत सावंत, प्रतिक नाईक, वैष्णवी सासोलकर, शुभम रॉय, कल्पेश जाधव देवश्री देसाई, दिनेश सैनी, शर्वरी पडवळ सुयोग देसाई व प्रणव सावंत तसेच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर याचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!