सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर.

 सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२४  रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
     महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी निबंध तसेच पोस्टर  प्रेझेंटेशन च्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.  निबंध स्पर्धेसाठी  इंडिजीनस टेक्नोलॅजी फॉर विकसित भारत हा विषय देण्यात आला होता या विषयावर कु.  काजल हिंदराव कुपाळे - प्रथम क्रमांक, कु.  विठ्ठल दुलाजी सावंत – व्दितीय क्रमांक, कु .मोहिनी भिल्लू जाधव, कु. साक्षी संजय धुरी – संयुक्त तृतीय क्रमांक व कु. मेहेरोझ शेख, हिने उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन साठी इंडिजीनस टेक्नोलॅाजी फॉर विकसित भारत आणि इम्पॅक्ट ऑफ कोविड १९ ऑन एज्युकेशन ॲण्ड देअर पॉसीबल सोल्युशन हे विषय देण्यात आले होते या विषयावर कु. भार्गवी संजय कवाटकर, कु. ऋतुजा उगवेकर, कु. प्राची कदम, कु. सानिका पाताडे या विद्यार्थ्यांनींच्या ग्रुपने प्रथम क्रमांक , कु.चैतन्या शिवराम परब व्दितीय क्रमांक, कु.सुयोग यशवंत राऊळ तृतीय क्रमांक , कु.काजल नामदेव बागवे हिने उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले  . निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुप्रिया नलावडे. व डॉ. शुभांगी माने यांनी परीक्षण केले. पोस्टर प्रेझेंटेशन साठी प्राचार्य डॉ. महेश साटम, प्रा.  एकनाथ मांजरेकर व प्रा.  नितीन शिवशरण यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.  समृद्धी ढोके हिने प्रभावीपणे केले.
     महाविद्यालयाच्या कु.राज देसाई, कु.वैष्णवी घारे, कु.सोहम सुतार  या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण शैलीद्वारे विज्ञान दिवसाचे महत्व पटवून दिले. 
         राष्ट्रीय विज्ञान दिवस सुव्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी कु. संजना नाईक, कु. वनिता वराडकर, कु.समृध्दी ढोके, अवैष्णवी घारे, कु.राज देसाई, कु. मुज्जमिल शेख, कु.समिधा शिंदे , कु. वैभव वाईरकर, कु.रोहन परब, कु.विठ्ठल सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
    हा कार्यक्रम प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, राष्ट्रीय सेवा योजना संयोजक डॉ. शुभांगी माने, प्रा. अरविंद कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न झाला.
    या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा श्रीमती नीलमताई राणे, उपाध्यक्ष मा. निलेश राणे, सचिव मा. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे. प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रोत्साहित केले.
error: Content is protected !!