सुकळवाड-तळगाव-बाव प्रजिमा-२७ कर्ली खाडीवरील ब्रिज साठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे यांची शिफारस
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतूद
प्रतिनिधी । कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आणि कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बाव-तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी मंजुरी मिळाली असून. कालच सादर झालेल्या अर्थअंकल्पात या पुलासाठी एकूण १७ कोटी ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधी उपलब्धतेमुळे आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.
कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या बाव-तळगाव सुकळवाड प्रजिमा २७ कर्ली खाडीवरील या ब्रिजसाठी निधी मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्याजवळ भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, मालवण तालुक्यात धोंडी चिंदरकर, बाव माजी सरपंच तथा भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब, तळगाव शक्तिकेंद्र प्रमुख जगदीश चव्हाण, दत्ताराम सावंत आदी पदाधिकाऱ्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार कालच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्प अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राज्य अर्थसंकल्प अंतर्गत १७ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अनेक वर्षाची मागणी असलेल्या या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तळगाव ग्रामस्थ महेश परब, नामदेव दळवी, सुभाष सावंत, प्रकाश सावंत, अक्षय दळवी, संदिप दळवी, लवु दळवी, महेश दळवी, अक्षय दळवी , प्रसन्न दळवी, प्रथमेश दळवी, प्रकाश दळवी, राजेंद्र दळवी, नरेंद्र पावसकर, प्रियांका पावसकर, अर्जुन तळगावकर, मिथुन ताळगावकर, मुरारी टेमकर, अशोक परब, मंगेश चव्हाण, प्रकाश गावडे, सुनील परुळेकर, दीपक चव्हाण तसेच बाव ग्रामस्थ सुनील वेंगुर्लेकर, गणपत परब, निलेश परब, विराज बावकर, लक्ष्मण नेवाळकर, ओंकार सातरडेकर, विजय गावकर आदींनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
प्रतिनिधि, कोकण नाऊ, कुडाळ.