सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळणार

विधान भवनात आज पणन मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश येणार

काजू पिकाला हमीभाव द्यावा व काजू शेतकऱ्यांना अनुदान द्यावे याकरिता आज विधान भवनात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोकणातील काजू शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे अशी आग्रही मागणी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी या बैठकीत केली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनीच गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना हे अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदान देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. त्यावर उपस्थित सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत हा विषय घेऊन ही मागणी मान्य लावण्याबाबत ग्वाही दिली. अशी माहिती श्री जठार यांनी दिली. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना देखील आता काजू बि ला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे श्री जठार यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!