खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद आंदोलन

नांदगाव येथील महामार्ग भू संपादन बाधित शेतकरी रोहन प्रकाश नलावडे यांनी केलेय आंदोलन

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील नांदगाव तिठा येथील रहिवासी श्री रोहन प्रकाश नलावडे यांनी आज खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२ कार्यालयासमोर भू संपादन प्रक्रियेत जमिनीचा मोबदला न मिळाल्याबद्दल व बेकायदेशीर रित्या जमीन बळकावून व उत्खनन करून आपल्या असलेल्या घराला धोका निर्माण केल्याबद्दल महामार्ग प्राधिकरणकडून त्यांच्यावर झालेल्या अन्याय बद्दल सरकारी दरबारी दाद मागून सुधा न्याय मिळत नसल्यामुळे आज दी.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून पासून झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी बेमुदत घंटा नाद आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान नांदगाव तिठा येथील श्री रोहन प्रकाश नलावडे यांनी आज खारेपाटण राष्ट्रीय महामार्ग उपविभगिय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग,
उपविभगिय अधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली,राष्ट्रीय महामार्ग कार्यलय खारेपाटण,उप अधीक्षक भूमी अभिलेख कणकवली
पोलीस ठाणे कणकवली,वनशेत्रपाल कार्यलय कणकवली,म.रा.वि.वी. कंपनी मर्या.कणकवली याना दिले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार बच्चू कडू यांनी देखील लेखी निवेदन देऊन आपली न्यायिक मागणी सादर केली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील नांदगाव तिठा येथील भू संपादित प्रकलपग्रस्त शेतकरी श्री रोहन प्रकाश नलावडे यांचे घर महामार्गाला लागून असून या घराच्या समोरील ५ गुंठे जमीन हायवे प्राधिकरणाने संपादित केली असून १/८२ शेत्राचे व घरासमोरील शेडचे झालेले नुकसान याचा मोबदला अद्याप त्यांना मिळालेला नाही.तसेच घराकडे येणारा रस्ता देखील यामुळे बंद झाला असून घराच्या आजूबाजूला असलेली झाडे तोडण्यात आली असून याचा मोबदला देखील मिळालेला नाही याबरोबरच अनधिकृतपणे ३ हजार ब्रास माती उत्खनन केल्यामुळे श्री नलावडे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.
या घटनेला एकूण ५ वर्षे पूर्ण झाली असून प्रशासन कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दीना दिवशी .२६ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आपण आंदोलन केले होते यावेळी प्रशासनकडून आंदोलन मागे घ्या. आपले सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.मात्र या घटनेला १ महिना होत आला तरी देखील कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने व आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आपण पुन्हा एकदा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी व आपल्याला न्याय मिळण्यासाठी खारेपाटण येथील राष्ट्रीय महामांर्ग उपविभगीय कार्यालय क्र.२ समोर सकाळी १०.०० ते सायं.५.०० वाजेपर्यंत घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नांदगाव तिठा येथील रहिवासी व राष्ट्रीय महामार्ग भू संपादन प्रकल्पग्रस्त शेतकरी श्री रोहन प्रकाश नलावडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने खारेपाटण येथील राष्ट्रीय महामांर्ग उपविभागीय कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर राष्ट्रीय महामार्ग उप विभगीय कार्यलय खारेपाटण उपवीभागिय अभियंता यांनी याबाबत आंदोलनकर्त्या व्यक्तीला लेखी पत्राने खुलासा दिला असून श्री नलावडे यांचेकडून कार्यालयाला आजपर्यंत प्राप्त झालेल्या पत्रानुसार योग्य ती कार्यवाही प्रशसनाकडून करण्यात आली असून शेवटचा पत्रव्यवहार या कार्यालयाला दी.८ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेला असून त्याबाबत माहितीच्या अधिकारी खाली आपल्याला हवी असलेली माहिती दी.१३ /२/२०२४ रोजी लेखी स्वरूपात देण्यात आली असल्याचे व अधिक माहिती हवी असल्यास दी.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रत्यक्ष येऊन प्राप्त करून घ्यावी असे कळविण्यात आले असल्याचे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण उप विभागीय कार्यालय क्र.२ चे उपविभगोय अभियंता अतुल शिवणीवर यांनी सांगितले.
मात्र श्री रोहन नलावडे यांच्या खारेपाटण येथील भर रखरखत्या उन्हातील आंदोलन स्थळी दुपारपर्यंत तरी कुठलेच पक्षाचे राजकीय पुढारी किंवा प्रशासकीय अधिकारी फिरकले नसल्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संविधानिक व न्यायिक पद्धतीने न्याय मागणाऱ्या व्यक्तीला खरोखरच न्याय मिळेल का ?असा सवाल आता आंदोलन कर्त्यांच्या बाजूने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!