रस्त्यासाठी तोंडवळी ग्रामस्थांचा रस्ता रोको

आश्वासनाअंती तोंडवळी वासियांचा रस्तारोको तातत्पुरता स्थगित

आचरा दुरावस्था झालेल्या तोंडवळी तळाशील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करत तोंडवळी ग्रामस्थांनी आचरा मालवण रस्त्यावर तळाशील फाटा येथे रस्तारोको करत वाहतूक रोखून धरली होती. गेले वर्षभर शासन दरबारी मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी शासनला जाग आणण्यासाठी रस्तारोको केला तब्ब्ल तासभर सुरू असलेले रस्तारोको आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी रस्तारोकोस्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या चर्चेअंन्ती खराब झालेल्या रस्त्याचे येत्या दोन दिवसात खड्डे बुजवले जातील तसेच चालू असलेल्या बजेटमध्ये रस्त्याच्या निधीला मंजुरी मिळवून घेतली जाईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी सर्वगोड यांच्या सूचनेनुसार दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन येत्या आठ दिवसासाठी स्थगित केले. येत्या आठ दिवसात रस्त्या बाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आंदोलन चालू होताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मालवण पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नादोस्कर तसेच आचरा व मालवण पोलीस दाखल झाले होते आंदोलन स्थळी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आंदोलन न करण्याची सूचना केली मात्र ग्रामस्थ आंदोनावर ठाम होते जोपर्यंत सक्षम अधिकारी जागेवर येऊन रस्त्याची हमी देत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला या आंदोलनात तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या मनस्वी चव्हाण,सुजाता पाटील,अनन्या पाटील,संजय केळुसकर, दीपक कांदळकर, नाना पाटील, ज्ञानेश गोलतकर तसेच शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तासाभरात दाखल होतो असे सांगणारे अधिकारी दोन तास उलटूनही हजर होत नसल्याने पुन्हा ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला तब्ब्ल तासभर ग्रामस्थांनी रस्ता अडवला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू या आंदोलन स्थळी उशिराने दाखल झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावते असे सांगितले मात्र संतप्त ग्रामस्थांनी आपण वर्षभरपूर्वी असेच अश्वासन दिले होते मात्र कोणतीही काम झाले नाही. ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून हटवण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थ व पोलीस यांच्यात शब्दिक चकमकी उडल्या ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून बाजूला घेत अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात पुन्हा चर्चा घडवून आणली. उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असल्याने दिलेल्या आश्वासनावर समाधानी नसल्याने वरिष्ठ अधिकारी सर्वगोड यांच्याशी संपर्क करत ग्रामस्थांशी त्त्यांचा संवाद घडवून आणला यावेळी सर्वगोड यांनी येत्या दोन दिवसात पडलेले खड्डे कार्पेट घालून बुजवले जातील तसेच चालू बजेटमध्ये या रस्त्यासाठी मंजुरी मिळवून घेतली जाईल असे आश्वासन दिले

error: Content is protected !!