देवगड तालुक्यात भाजपाला ठाकरे गटाकडून धक्का

स्वाभिमान पक्षाचे माजी अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष राजा परब शिवसेना ठाकरे गटात

देवगड तालुक्यामध्ये भाजपाला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का देण्यात आला असून विभागीय अध्यक्ष व राणे समर्थक स्वाभिमान पक्षाचे माजी अध्यक्ष राजा परब (पडेल) यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशाप्रसंगी तालुका प्रमुख जयेश अशोक नर , महिला तालुका प्रमुख सायली घाडी , उपतालुका प्रमुख सुनील तेली कृषी तालुका प्रमुख प्रमुख सुनील जाधव वाडा (सरपंच) युवासेना तालुका प्रमुख फरीद काझी , जेष्ठ समाज सेवक, उदयोजक यधूशेठ ठाकूर ,उप सरपंच विश्वनाथ पडेलकर (पडेल) , अर्पिता पाटणकर, पडेल ,वैशाली माळगावे, पडेल, संतोष मोंडे शाखाप्रमुख (पडेल) , संदीप वाडेकर जेष्ठ शिवसैनिक (पडेल) , वसंत वारिक, जेष्ठ शिवसैनिक ( पडेल), (वाडा) राजू तावडे , शशांक तावडे , सुवास वाडेकर (पिंट्या), विजय कारेकर जेष्ठ शिवसैनिक , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देवगड प्रतिनिधी

error: Content is protected !!