शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुडाळ – शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव व साळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साळगाव ग्रामपंचायत येथे उत्साही वातावरणात शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत व शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा जयघोष करणाऱ्या पोवाड्यासह ढोलताशांच्या गजरात शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या विद्यार्थ्यांनी साळगाव विद्यालय ते साळगाव ग्रामपंचायत अशी आकर्षक वेशभूषेसह अतिशय शिस्तबद्ध रॅली आयोजित करण्यात आली होती.तदनंतर साळगाव ग्रामपंचायत येथे साळगाव सरपंच सौ.अनघा दळवी, उपसरपंच श्री गजानन पवार,शिक्षण प्रसारक मंडळ झारापचे संस्था सचिव तथा साळगावचे माजी सरपंच श्री मुकुंद धुरी, माजी सरपंच श्री उमेश धुरी, माजी उपसरपंच श्री अमित दळवी,श्री रुपेश जाधव, श्री दत्तप्रसाद साळगावकर,तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रसाद परुळेकर साळगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली यावेळी साळगाव विद्यालयातील विदयार्थीनी कुमारी दुर्वा धुरी हिने महाराज्यांच्या जीवनातील काही प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने व कुमार भुविक नरेश धुरी यांने “अफझल खानाच्या वधाचा” प्रसंग पोवाड्यासह सादर करून उपस्थितीतांची दाद मिळविली . यावेळी या दोन्ही विद्यार्थ्यांना साळगाव उपसरपंच श्री गजानन पवार, माजी उपसरपंच श्री अमित दळवी ,माजी सरपंच श्री उमेश धुरी,मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार, श्री सावंत विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री विश्वास धुरी यांनी रोख स्वरूपात बक्षिसे देऊन कौतुक केले. यावेळी संस्था सचिव श्री मुकुंद धुरी यांनी महाराज्यांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा दाखला देत आपण महाराजांची शिकवण आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावचे सहाय्यक शिक्षक श्री एकनाथ कांबळे यांनी महाराज्यांचा जीवनपट विविध दाखले देत समजावून सांगितला व विद्यार्थ्यांनी महाराज्यांच्या इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालून आपले जीवन समृद्ध करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी साळगाव सरपंच सौ.अनघा दळवी तसेच माजी सरपंच श्री उमेश धुरी यांनी विद्यार्थ्यांनच्या खाऊची व वाहतुकीची सोय उत्तम प्रकारे केली व विजया प्रॉडक्ट्सचे मालक श्री सुनील वारंग यांनी सरबतचे वाटप केले तसेच संस्था संचालक श्री पद्माकर धुरी व मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनीही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले तसेच कुमार गुरुप्रसाद परब,कु.अनुप देवळी,कु.प्रणव बोभाटे, कु.यश पेडणेकर व इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या ढोलवाद्याने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केली रॅलीसाठी श्री सुखानंद हळदणकर यांनी गाडी उपलब्ध करून दिली.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणारे विद्यालयाचे कला शिक्षक श्री आनंद हळदणकर यांनी विद्यालयाला महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली. शिवाजयंतीचा कार्यक्रम सुनियोजित पारपाडण्यासाठी संस्था, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी तर सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक श्री परशुराम नार्वेकर यांनी तर आभार साळगाव उपसरपंच श्री गजानन पवार यांनी मानले

error: Content is protected !!