माऊली, वाघदेव देवस्थान सोमवती यात्रेहून असनियेमध्ये उद्या दाखल होणार

दोडामार्ग : असनिये गावातील ‘श्री देवी माऊली, वाघदेव देवस्थान’ असनिये हे एक जागृत देस्थान आहे. या देवस्थानचे अधिपती मानले जाणारे श्री माऊली वाघदेव रविवार, १९ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थानातून दिंडी घेऊन सागरेश्वर तीर्थ क्षेत्रावर स्थान करण्यासाठी निघाले होते. कोरोना काळात सोमवती यात्रा गेली नव्हती. ही यात्रा तब्बल सात वर्षानंतर पुन्हा काढण्यात आली. पूर्ण गाव या दिंडीत सामील झाला होता. श्री माऊली मातेची पालखी खांद्यावर घेऊन सोबत तरंग नाचत गाजत दिंडी काढण्यात आली होती.
श्री देवी माऊली मातेची पालखी आणि दिंडी रविवारी रात्री तुळस येथे स्वप्नील गोरे यांच्या निवस्थानी रात्री विश्रांतीसाठी थांबली होती. तिथे दिंडी घेऊन आलेल्या भक्तांचा पाहुणचार खूपच छान आणि व्यवस्थितपणे गोरे कुटुंबीयांनी केला. दुसऱ्या दिवशी सकाळी गोरे कुटुंबियांच्या घरून ही पालखी आणि दिंडी करू ठीक ६.०० वाजता सागरेश्वर तीर्थावर स्थान करायला पोचली. तिथे तब्बल २ तास भक्तांनी स्नान केले आणि तिथून पुन्हा ही पालखी गोरे कुटुंबियांच्या घरी महाप्रसादसाठी पोहचली. महाप्रसाद होईपर्यंत गावातील मंडळींनी श्री देवी माऊली मातेची ओटी भरत पूजा करून आपल्या अडचणीबद्दल बोलत माऊली जवळ आपल्या निरोगी आणि चांगल्या आयुष्यासाठी आशीर्वाद घेतला.
गावातील मंडळींनी जाऊन येईपर्यंतचा प्रवास खूपच सुंदर शब्दात मांडला. रुपेश सावंत, विकास सावंत, शुभम सावंत, वैभव सावंत, जितेंद्र सावंत, बाबल सावंत, दाजीकाका सावंत, भिकाजी नाईक, विद्या सावंत, भरत पेडणेकर, दीपक पेडणेकर, प्रकाश सावंत मंडळींनी माहिती पुरवली. ही पालखी उद्या २२ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत पुन्हा आपल्या अध्यस्थानी पोहचले. पालखी मंदिरात पोहचल्यानंतर बाकी धार्मिक विधी केले जाणार आहेत. धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी यावे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग

error: Content is protected !!