कुडाळ येथे १८ रोजी प्रदीप केळुसकर यांच्या “माणिक मोती चा” प्रकाशन सोहळा

कुडाळ : दिनांक १८ फेब्रुवारी रविवार रोजी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे सायंकाळी चार वाजता लेखक प्रदीप केळुसकर यांच्या ‘ माणिक मोती ‘ या दुसऱ्या कथा संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळयाला जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, शाखाध्यक्ष वृंदा कांबळी, प्रा. संतोष वालावलकर आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. तरी सर्व साहित्यप्रेमीनी या प्रकाशन सोहळयास उपस्थित राहून लेखकास शुभेच्छा व प्रेरणा द्याव्यात व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे कोमसाप कुडाळ शाखेच्या अध्यक्षा वृंदा कांबळी व सचिव सुरेश पवार यांनी कळविले आहे.