शासकीय रेखकला परीक्षेत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावचे घवघवीत यश

साळगाव (कुडाळ) – दरवर्षी प्रमाणे कला संचलनाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने शासकीय रेख कला परीक्षेचे आयोजन करण्यात आले येते. ऑक्टोबर 2023 रोजी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन परीक्षा महाराष्ट्रातील सर्व केंद्रावर पार पडला होत्या.या परीक्षेचा विद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे १००% लागला.एलिमेंटरी परीक्षेत कु.निधी सावंत, कु.रसिका धुरी, कु.तन्वी डिचोलकर,कु.सेजल माणगांवकर,कु.आदित्य माणगांवकर,कु.निखिल मेस्त्री,कु.तुकाराम हळदणकर,कु.मधुकर मेस्त्री,कु.सर्वेश हळदणकर या ‘अ’ श्रेणीत तर ४ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.तर इंटरमिजिएट परीक्षेत कु.गितेश मेस्त्री, व कु.अनुप देवळी हे विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत व अन्य ५ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ होणार आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कला शिक्षक श्री आनंद हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शिक्षण प्रसारक मंडळ झारापचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर व सचिव श्री मुकुंद धुरी यांनी संस्थेच्या वतीने तर शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री व मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी प्रशालेच्या व शिक्षक- पालक संघाच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!