कलमठ गावडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

13 फेब्रुवारी रोजी होणार डबलबारी चा सामना

गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळ व गायत्री युवा प्रतिष्ठान कडून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

दिगंबर वालावलकर । कणकवली : मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने कलमठ गावडेवाडी येथील गणेश मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता गणेश मूर्ती चे मिरवणुकीने आगमन. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता आरती, 9 वाजता गणेश पूजन, 10 वाजता सत्यनारायण पूजा, 12 वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजल्यानंतर भजने, व 7 वाजता बुवा दुर्वास गुरव विरुद्ध बुवा व्यंकटेश नर यांचा डबलबारी भजनांचा सामना. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व रात्री 8 वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. रेकॉर्ड डान्स स्पर्धेला प्रथम पारितोषिक 5000, द्वितीय 3000, तृतीय 2000 अशी बक्षिसे असणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळ व गायत्री युवा प्रतिष्ठान गावडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ,कणकवली

error: Content is protected !!