केळवली पंचक्रोशी वैश्य समाजाच्या वतीने परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे श्री. वामनाश्रम महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 वैश्यगुरू प. पू.श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचे आज्ञेनुसार गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे  केळवली, मोरोशी,मोसम , कोंडोशी,निखरे, हसोळ पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक  6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वा.श्री.श्री.वामनाश्रम महस्वामीजी यांचे प्रतिमेची पूजाअर्चा करून गुरू सत्संग सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी सर्व वैश्य बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम  यशस्वी केला. सकाळी अकरा वाजता श्री श्री वामनाश्रम महास्वामी यांच्या प्रतिमेचे आगमन उंडील मठातील मान्यवरांच्या हस्ते गगनगिरी सेवाश्रम केळवली येथे झाले . ढोल ताशाच्या गजरात केळवली पंचक्रोशीतील वैश्य बांधवांनी गुरु प्रतिमेचे स्वागत केले. त्यानंतर गुरूंच्या प्रतिमेची स्थापना करून पूजा विधी पार पडल्या. यावेळी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने वैश्य बांधव उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मान्यवर वैश्यबांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापूजा संपन्न झाल्यानंतर गुरूंची महाआरती पार पडली. महाआरतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या विविध मान्यवर वैश्य बांधवांचा पंचक्रोशीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये 

श्री महेंद्र मुरकर अध्यक्ष
वैश्य समाज कणकवली,
श्री गणपत वळंजु चेअरमन सिंधुदुर्ग वैश्य समाज बँक
श्री उमेश वाळके संचालक,
श्री गणपत पारकर संचालक
श्री गुरुनाथ पावसकर सेक्रेटरी
श्री ईश्वरदास पावसकर मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री मोहन मोदी वसुली अधिकारी
श्री महेश पारकर खजिनदार उंडील मठ
श्री बाळा जठार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
श्री रवींद्र शेट्ये सरपंच शिडवणे
डॉक्टर संजय कोकाटे शिडवणे
श्री चंद्रकांत कानकेकर वारगाव
श्री अशोक कोकाटे साळीस्ते
श्री प्रभाकर ताम्हणकर सरपंच साळीस्ते
श्री वीरेंद्र चिके माजी सरपंच खारेपाटण
श्री रमेश नर उंडील आश्रम कमिटी
श्री चंद्रकांत शेट्ये माजी पोलीस पाटील खारेपाटण
श्री सुधीर नकाशे माजी जिल्हा परिषद सदस्य
श्री बाबा कोकाटे नाधवडे
श्री प्रफुल्ल कोकाटे नाधवडे
सौ. उज्वला चिके महिला ओबीसी तालुका अध्यक्ष कणकवली भाजपा
अशा विविध मान्यवरांचा पंचक्रोशीतील वैश्य बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मान्यवरांच्या सन्मानानंतर वैश्य बांधवांनी स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले व प्रसाद घेतला. त्यानंतर सर्व वैश्य बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसाद व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला .या संपूर्ण कार्यक्रमाला सुमारे पाचशे ते सहाशे वैश्य बांधव उपस्थित होते .अशा प्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला .केळवली पंचक्रोशीतील सर्व वैश्य बांधवांनी परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम समिती यांनी सदर कार्यक्रमासाठी सेवाश्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!