जिल्हास्तरीय श्रीराम गीतगायन स्पर्धा 2024 मध्ये प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई प्रथम क्रमांकांची मानकरी

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेची विद्यार्थिनी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने कै. नीता निळकंठ दीक्षित स्मृतिप्रत्यर्थ श्री निरंजन निळकंठ दीक्षित पुरस्कृत जिल्हास्तरीय श्रीराम गीतगायन स्पर्धा 2024 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्राजक्ता हिला प्रशालेचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर आणि तिचे कुटुंबीय यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले.
या तिच्या घवघवीत यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सहसचिव राजेंद्र वरुणकर,खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राजक्ता हिचे अभिनंदन केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!