कुडाळ तहसिलदार अमोल पाठक म्हणजे सर्वसामान्य जनतेचे महसूल अधिकारी – अतुल बंगे

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमोल पाठक यांना शुभेच्छा

अमोल पाठक यांची पालघर जिल्ह्यात झालीय बदली

प्रतिनिधी । कुडाळ : सुट्टीच्या दिवशी सुध्दा जनतेच्या योजना किंवा दाखले देणारे तहसिलदार आपण तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहीलेच पाहीले. आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार त्यांनी गावा गावात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव तयार केले. कुडाळ तहसिलदार अमोल पाठक हे सर्वसामान्य जनतेचे तहसिलदार म्हणून आज नाव लौकीक मिळवुन जात आहेत असे गौरवोद्गार शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल बंगे यांनी काढले. कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांची पालघर जिल्ह्यात बदली झाल्याने कुडाळ शिवसेना तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री बंगे बोलत होते,
श्री बंगे बोलताना पुढे म्हणाले कि आपण संजय गांधी निराधार योजना समीती अध्यक्ष असताना गावागावात जाऊन योजनेचे प्रस्ताव तयार केले. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेचे पालन केल्याने गावा गावात गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. रविवार सुट्टी असली तरी एका फोनवर उत्पन्न दाखले देणारे किंवा सहज उपलब्ध होणारे तहसिलदार अमोल पाठक हे एकमेव आपण तीस वर्षांच्या कालखंडात पहीलेच बघितले. असे आदर्शवत तहसिलदार कुडाळ तालुक्याला मिळाल्याने कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून तहसिलदार यांनी काम केले. भविष्यात त्यांची जागा भरुन काढण्याचे काम येणारे नुतन तहसिलदार करतील अशी अपेक्षा श्री बंगे यांनी व्यक्त करुन श्री पाठक हे कुडाळ उपविभागीय अधिकारी महसुल म्हणून पुन्हा यावेत अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेते राजू गवंडे, कुडाळ तालुका शिवसेना सरपंच संघटना अध्यक्ष मिलिंद नाईक, माजी नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे मितेश वालावलकर, कुडाळ शहरं शिवसेनेचे नितीन सावंत उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!