जनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती
कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात उसळणार शिवसैनिकांचा जनसागर
जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनतेच्या आग्रहाखातर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात उद्या रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता जनसंवाद सभा होणार आहे . लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे.
या जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला
आहे. रविवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता
गांधीचौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा, कुडाळ जिजामाता
चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील.
दुपारी 3 वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर
छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि
मंदिर नूतनीकरण चे शिवप्रेमींना लोकार्पण करणार आहेत.
त्यानंतर 5 वाजता आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेऊन
सायंकाळी 6 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेत संबोधित करणार आहेत. 5 फेब्रुवारी राजापूर धूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चिपळूण येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली