वेरली येथे अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा व्याख्यान संपन्न

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रसार आणि प्रचार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरली नंबर १ तालुका मालवण येथे मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत बालक पालक यांच्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती वेरली नं . १ चे अध्यक्ष नारायण पोयरेकर व सचिव तथा मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार यांनी अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या उपक्रमात अंतर्गत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक श्री . विजय चौकेकर यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 चे प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित केले होते .
या व्याख्यानामध्ये श्री . विजय चौकेकर यांनी आमचा देव धर्माला विरोध नाही मात्र देव धर्माच्या नावाने सर्व सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या आणि जादूटोणा करून फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबां विरोधातील लढा असल्याचे सांगितले .
यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थांना मार्गदर्शन करताना मुठ मारणे,देवी अंगात येणे, भूत अंगात येणे ,करणी- भानामती करणे, मंत्राने लोकांचे रोग बरे होतात का? मंत्राने सापाचे विष उतरले जाते का? याविषयीची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाद्वारे करून दिली, आणि जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन का आवश्यक आहे हे समजून देऊन जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनच अवलंबला पाहिजे असे ठामपणे सांगितले .
यावेळी त्यांच्यासोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण पोयरेकर, मुख्याध्यापक राजेंद्र धारपवार ,उपसरपंच दिनेश परब, माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गौतम तांबे, शिक्षक उमेश खराबी, शिक्षिका विमल खराबी, शिक्षणप्रेमी कल्याणी तांबे, माजी शिक्षणप्रेमी धर्मसिंधू तांबे, पत्रकार अनिल तोंडवलकर, पालक सत्यवती परब, समृद्धी तोंडवळकर, भाग्यश्री परब, अनिता लाड, आदी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विजय चौकेकर यांचा शाळेचे स्मृती चिन्ह आणि पुच्छ गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश खराबी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिक्षिका विमल खराबी यांनी केले .

मसुरे ( वार्ताहर )

error: Content is protected !!