अरविंद करलकर यांची वृद्ध कलाकार मानधन समितीवर निवड

निलेश जोशी । कुडाळ : राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन जिल्हास्तरीय निवड समितीचा विस्तार करण्यात आला असून त्या समितीत शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी निवड करण्यात आली आहे. श्री. करलकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे हे काम पाहत आहेत. तर शैलेश जामदार हे या समितीमध्ये उपाध्यक्ष आहे. त्याशिवाय राजाराम धुरी, रितेश सुतार, सौरभ पाटकर, अजिंक्य पाताडे, मारुती सावंत यांचा या समितीत सदस्य म्हणून सहभाग आहेत. आता या समितीचा विस्तार करण्यात आला असून अरविंद करलकर यांची या समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





