कुडाळ शिवसेना कार्यालयात सिंधुरत्न योजनेचे फॉर्म उपलब्ध

रुपेश पावसकर यांनी घेतली सिंधुरत्न अधिकाऱ्यांची भेट
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुरत्न योजनेचे फॉर्म शिवसेना कुडाळ कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली आहे. .रुपेश पावसकर यांनी संदर्भात जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिष्टमंडळासह सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अधिकारी श्री.आनंद तेंडुलकर यांची भेट घेतली.
कुडाळ मालवण मधील सिंधूरत्न योजना लाभार्थी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुरत्न योजनेचे अधिकारी आनंद तेंडुलकर यांनी सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये कोणते लाभार्थी लाभासाठी पात्र असतील याविषयी विस्तृत माहिती सांगितली . सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये अंड्यावरील कुकुटपक्षी योजना, शेळी मेंढी पालन,दुधाळ जनावरे पुरवठा योजना,शेळीगट योजना,न्याहारी निवास योजना,फूड सेकुरिटी आर्मी प्रशिक्षण योजना,बचतगटांना अन्न प्रक्रिया उद्योग पिशवीतील वस्तू विक्रीसाठी 75% सबसिडी,आदी योजना संदर्भात सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अधिकारी आनंद तेंडुलकर यांनी माहिती दिली.
यावेळी कुडाळ मालवण मधील या योजनेचे अर्ज शिवसेना कार्यालयात संतोष परब,मोबाईल नंबर ९३७०९८३००३ यांच्याजवळ उपलब्ध आहेत. या योजनेतील सर्व लाभार्थी यांना सिंधुरत्न समृद्धी योजनेसाठी सिंधुरत्न समिती अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार मंजुरी मिळणार आहे. तरी सर्व लाभार्थी यांनी शिवसेना कार्यालयात संतोष परब,यांना संपर्क करून जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. .यावेळी शिवसेना शिष्टमंडळाला वेळ दिल्याबद्दल शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अधिकारी श्री.आनंद तेंडुलकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.