स्फोटक वस्तू चावल्याने गाय गंभीर जखमी

बांबुळी-नेहरूनगर येथील घटना
अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी । कुडाळ : चरायला सोडलेल्या गायीने गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ चावल्याने त्याचा स्फोट होऊन बांबुळी-नेहरूनगर धनगरवाडी येथील कानोजी पांडुरंग म्हाडदळकर यांची गाय गंभीर जखमी झाली आहे. याबाबत कानोजी म्हाडदळकर यांनी अज्ञातांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याबाबत माहिती अशी कि, कानोजी पांडुरंग म्हाडदळकर हे बाबुळी नेहरु नगर, धनगरवाडी येथे पाळ्या कुटुंबासमवेत एकत्र राहतात. ते शेती व्यवसाय करत असुन त्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत. त्यात तीन गायों व एक पाडा (वासरु) आहेत. सदरची जनावरे ही सकाळी व सध्याकाळी अशी ते त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेर जवळपास वाढलेल्या गवतात खुंठी लावुन लांब असणा-या दोरीने चरण्यासाठी बांधलेली असतात. हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम आहे.
२८ जानेवारी रोजी सकाळी 8.00 वा मानाने त्यांनी त्यांच्या घराच्या समोर वाढवलेल्या गवतात गावात खुंटी लावुन सदरची जनावरे चरण्यास सोडली होती. त्यानतंर साधारण 11.00 वाजण्याच्या मानाने ती जनावरे त्यांनी नेवुन घरातील बाजुच्या गोठ्यात बाधली होती. त्या नतंर परत सांयकांळी 3.00 वाजण्याच्या मानाने त्यांनी त्यांची जनावरे त्यात तीन गायी व एक पाडा (वासरु) या घराच्या पाठीमागील जवळपास असलेल्या गवतात खुंठी लावुन लांब असणा-या दोरीने बांधुन ते घरी आले आणि घरातीलच कामे करत असताना त्यांना 4.00 वा मानाने मोठा आवाज आला. त्यामुळे ते घराचे बाहेर आले व त्यांची पत्नी सौ. कल्पना ही पण घराचे बाहेर आली. त्यांची पत्नी कल्पना हीला बाहेर आल्यावर समोरील बाजुस ज्या ठिकाणी त्यांनी गायी व पाडा (वासरु) बांधलेली होती त्या ठिकाणाहुन धुर येताना दिसला. म्हणुन ती ज्या ठिकाणी धुर येत होता ठिकाणी धावत गेली. त्यावेळी गायीच्या तोंडातुन रक्त येत होते. म्हणुन कानोजी याना तीने हाक मारून बोलावुन घेतले. त्यावेळी गाय त्याठिकाणी उभी असुन तीचा जबडा फुटुन त्यातुन रक्त येत होते व आजुबाजुस रक्त पडलेले होते म्हणुन कानोजी यांनी ताबडतोब त्यांच्या मोबाईलवरुन गुरांच्या डॉक्टरना फोन केला व पोलीस स्टेशनला फोन करुन सदरची हकीगत सांगितली.
काही वेळाने गुरांचे डॉक्टर कानगुले व बाबुळी गावातील पशु मित्र ओंकार परब असे आले. त्यानतंर डॉक्टरांनी गायीवर औषधउपचार केले व सदरची गंभीर दुखापत ही गायीने स्फोटक पदार्थ तोंडात घेवुन चावल्याने स्फोट होवुन झाली आहे असे सागितले, त्यानतंर जखमी अवस्थेतील गायीला त्यांनी त्यांच्या वाडयात नेवुन बांधुन ठेवली. दोन दिवस गाईवर औषध उपचार केले व २९ जानेवारी रोजी त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान पोलिसांनी अज्ञातांविरोधात भारतीय दंड विधान १८६० कलम २८६ आणि ४२९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधीक तपास पोलीस करत आहेत. पण कोणा अज्ञाताच्या या कृत्याने एका मुक्या जनावराला मटार हकनाक मरणप्राय यातना सहन कराव्या लागत आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





