श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे मठामध्ये शनिवार दिनांक २७ जानेवारी 2024 रोजी आगमन

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे मठामध्ये शनिवार दि.२७जानेवारी २०२४ रोजी आगमन सांयकाळी ४.00वा.ग्रामपंचायत राठीवडे ते श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे पर्यंत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी सह पालखीची मिरवणूक

सांयकाळी ५.३०वा.गांगेश्वर भजन मंडळ, राठीवडे यांचा शालेय विद्यार्थी मुलामुलींचा दिंडी सप्ताह, ८.00वा महाप्रसाद, ९.00वा.ॐभवानी दशावतार नाट्यमंडळ, राठीवडे यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजाच्या पालखी व पादुका असणार आहे यानिमित्त विविध कार्यक्रम, तसेच पंचक्रोशीतील भजन मंडळांची भजने होणार आहे तरी स्वामी भक्तांनी या पालखी सोहळ्याचे दर्शन घ्यावे असे श्री स्वामी समर्थ मठ, राठीवडे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

संतोष हिवाळेकर, पोईप

error: Content is protected !!