जलकन्या पुर्वा गावडे हिची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

चेन्नई येथे होत आहेत सहाव्या खेलो इंडिया युथ गेम

आतापर्यंत अनेक स्पर्धा मधून मिळवलंय पूर्वा हिने यश

सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून चेन्नई येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेमसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे. याबद्द्ल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथोल पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यत तीने कमी वयात अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा मध्ये यश मिळविले आहे.गोवा येथे नोव्हेबर २०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठो मॉडर्न पेंटथलोन या क्रीडा प्रकरामध्ये महाराष्ट्र राज्यातून खेळली होती. तसेंच नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेतही तिची निवड होऊन तीने यश मिळविले आहे त्यानंतर आता तिची खेलो इंडियासाठी प्रथमच निवड झाली आहे.
चेन्नई येथे होत असलेल्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम २०२४ मध्ये जलतरण स्पर्धे मध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल या प्रकरामध्ये ती खेळणार आहे.महाराष्ट्र राज्यातून तिची पहिल्यांदाच खेलो इंडिया साठी निवड झाली असून अकरावी मध्ये शिकत असलेल्या पूर्वाने कमी वयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड होण्याची घेतलेली ही मोठी झेप कौतुकास्पद असुन सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!