सावंतवाडी रेल्वे टर्मिनस: आंदोलनात सहभागी व्हा

श्रीकांत सावंत यांचे आवाहन

सावतवाडी रेल्वे टर्मिनस त्वरित पूर्ण झालेच पाहिजे या आंदोलनाला मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे 26 जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनास मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत तमाम कोकणवासीयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे

कोकणच्या सर्व राजकीय पक्षांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आहे असे सांगून श्रीकांत सावंत म्हणाले ज्यांना आंदोलन स्थळी सावंतवाडीत येणे शक्य नाही त्यांनी 26 जानेवारीला जवळच्या रेल्वे स्थानकावर येऊन एक तासाचे लाक्षणिक आंदोलन करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अनेक वेळा आले त्यांनीही या विषयात लक्ष घालावे महाराष्ट्र सरकारने कोकणात कॅबिनेट बैठक घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस साठी भरगोस निधीची तरतूद करावी अशी मागणी ही श्रीकांत सावंत यांनी केली आहे.

सावंतवाडी, प्रतिनिधी

error: Content is protected !!