कणकवली गंगो मंदिर मध्ये श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

रोषणाईने मंदिर सजले
श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने कणकवलीत गंगो मंदिर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी प्रतिभा करंबेळकर ,शीतल मांजरेकर, कल्पना मसुरकर, कविता मसुरकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सुनील मांजरेकर, निलेश गोवेकर, मंगेश सावंत, जय शेट्ये, बाळा वळशिवडे , उद्योजक मुरलीधर नाईक यांसोबत अनेक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी मोठ्या प्रमाणात दिवे लाऊन रोषणाई करण्यात आली व मंत्र पठणाचा कार्यक्रम झाला.
कणकवली /प्रतिनिधी





