खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण : दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…

यावेळी लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची खारेपाटण एस.टी. स्टँड ते बाजारपेठ मार्गे किल्ले खारेपाटण अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली…

त्यानंतर किल्ल्यावरील शिवकालीन श्री.दुर्गादेवी मंदिरात देवीला श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे शिवकन्यांच्या हस्ते प्रथम पूजन करण्यात आले…व शिवज्योत आणणाऱ्या मावळ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला… त्यानंतर सर्व मान्यवर उपस्थितांनी व ग्रामस्थांनी शिवप्रतिमेचे पूजन केले… त्यानंतर किल्ल्याच्या बुरूजावर स्वराज्याचे ध्वजारोहण करून महाराष्ट्राच्या राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले…
शेवटी सर्वांना अल्पोपहार देऊन उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

यावेळी खूप मोठ्या संख्येने शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते…
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खारेपाटणच्या मा.सरपंच सौ.प्राची इस्वलकर व इतर सदस्य, कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव व त्यांचे इतर सहकारी ट्रस्टी, खारेपाटण महाविद्यालयाचे श्री.कांबळे सर, सय्यद सर व सर्व NSS विद्यार्थी, गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्रचे शुभम रानम व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले…
यावेळी खास कोल्हापूरहुन शिवज्योत आणलेल्या करण भिसे व त्याचे चार सहकारी तसेच समस्त नडगिवे ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाला बाईक रॅलीने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा अजून वाढवली…

तर जांभई-हनुमान ढोल पथक, पोंभुर्लेच्या साथीने लेझीम नृत्य सादर करून आदिनाथ कलाविष्कार गृप, खारेपाटणने कार्यक्रमाला अजून बहार आणली…

या कार्यक्रमासाठी गुरुप्रसाद शिंदे यांनी सकाळी ढोलपथक व लेझीम पथक यांना अल्पोपहार दिला, विजय देसाई यांनी ढोलपथक मानधन दिले, सौ.प्राची इस्वलकर यांनी ग्रा. पं. खारेपाटणतर्फे सर्वांना अल्पोपहार दिला तर सर्वश्री मधूकरशेठ गुरव, प्रवीण उर्फ बंड्या लोकरे व ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे यांनी योगदान दिले…

या संपूर्ण कार्यक्रम आयोजनासाठी श्री.ऋषिकेश जाधव, श्री.मंगेश गुरव, श्री.प्राजल कुबल, सुमित रोडी इत्यादी शिवप्रेमी मावळ्यांनी योगदान दिले…

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!