एस. एम. हायस्कूल कणकवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण : येथील कणकवली शिक्षण संस्था कणकवली संचलित एस.एम. हायस्कूल प्रशालेच्या मार्च २०२३ दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शुक्रवार दिनांक १७ रोजी उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी संस्था कार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस. वायंगणकर, उपमुख्याध्यापक श्री. पी. व्ही. कांबळे, पर्यवेक्षक श्री. जी. एन. बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वायंगणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवावा आणि हे करताना आज लहानपणापासून लागत असलेले मोबाईलचे व्यसन यापासून प्रत्येकाने जाणीवपूर्वक लांब राहावे असा मोलाचा संदेश दिला.
यानंतर दहावीचे विद्यार्थ्यी श्रावणी पाटकर, वेदांत तारळेकर, मंदार राणे, याशिका कदम, श्रावणी शिखरे, ऋषिकेश पाटील, अक्षय डिचोलकर, सिद्धी कुंभार, नेत्रा कदम, दिव्या लाड, केतकी साळवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयातील आनंददायी आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांच्यावतीने सौ एस. एस. तावडे सौ एस.पी. पाटकर व श्री व्ही. आर. घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक श्री जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक श्री. पी. व्ही. कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये परीक्षेला सामोरे जाताना आवश्यक बाबींकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.एस. एन. तायशेटे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास करताना शिस्त व संस्कारांसोबत जगाच्या आकाशात गरुड झेप घ्यावी आणि आपले व शाळेचे लौकिक करावे असा संदेश दिला.यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्था सचिव श्री डी. एम. नलावडे यांनी या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वक्तृत्व कलेचे कौतुक केले. जगात जीवन जगताना चांगल्या मित्रांची मैत्री करा व स्वतः सुद्धा एक चांगले मित्र बना . प्रत्येक विद्यार्थ्याने नावलौकिक मिळवावे .या संस्थेशी, संस्थेतील शिक्षकांशी नाळ जोडून ठेवावी. भविष्यात उंच ध्येय ठेवून मार्गक्रमण केले तर तुमच्या सोबतच शाळेच्या लौकिकात भर पडेल. आपणही या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.असे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्री व्ही.आर.घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा.शिक्षक श्री ए.ए. जगदाळे यांनी केले.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण