प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान………

कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत साहेब, बांधकाम विभाग कणकवली श्री सर्वगौडा यांनी “माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे वेळी उपस्थितीत होते,
यावेळी सिंधूनगरी चे संस्थापक व मालक श्री सुयोग पंडित यांच्या हस्ते सर्व मंडळाचे वतीने कणकवली चे तहसीलदार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,
कोकण नाऊ चे श्री दिगंबर वालावलकर यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या बांधकाम विभाग चे श्री सर्वगौडा यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला,
*यावेळी सर्व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आमच्या आग्रहास्तव तहसीलदार , बांधकाम विभाग चे यांनी कार्यक्रमाचे स्थळी उपस्थितीत राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली, आम्ही सर्व मंडळाचे वतीने त्यांचे , शतशः ऋणी आहोत, धन्यवाद आभारी आहोत,
याप्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते,





