कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत उद्या मंत्रालयात बैठक

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत बैठक लावण्याची मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत मुंबई मंत्रालय येथे उद्या मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सदरची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोकण नाऊ / सिंधुदुर्ग

error: Content is protected !!