शाकंभरी प्ले स्कुल च्या स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शीतल मांजरेकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
कणकवली : शाकंभरी प्ले स्कूल व डान्स क्लास चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच नगर वाचनालय हॉल कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या स्नेहसंमेलन साठी प्रमुख अतिथी म्हणून जीवन स्त्रोत सेवा संस्था आणि कनक सखी ग्राम संघाच्या अध्यक्ष शीतल मांजरेकर तसेच सह योगिनी सेवा मंडळ व रॉबिन हुड आर्मी चे अध्यक्षा सौ दीपा सरुडकर उपस्थित होत्या. या प्रसंगी प्ले स्कूल आणि डान्स क्लास विद्यार्थ्यांनी विविध नुत्य प्रकार सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. नृत्य प्रशिक्षिका सौ अंजली राणे यांचे या करिता मोलाचे मार्गदर्शन लाभले . या नंतर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. शाकंभरी ट्रस्ट चे अध्यक्षा सौ अनुराधा निगरे यांनी ट्रस्ट मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली . नगर वाचनालय चे कार्यवाहक अनिल मुसळे यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक पल्लवी कोकणी , कस्तुरी माणागावकर , तसेच सर्व पालकांचे सहकार्य लाभले.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली