शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दोडामार्ग : शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि शिवतेज मंडळ असनिये यांनी गावाच्या प्रशालेत ‘शिव जन्मोत्सव’ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला. पहाटे ठीक ५.३० वा. शिवतेज मंडळाचे मावळे यांनी हायस्कूल व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन हनुमंत गडावर पोचले. हनुमंत गड किल्ले येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर गंगाजलने अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर पूजा झाली आणि शिव ज्योत पेटवण्यात आली. सकाळी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष मंगेशदादा पाटील होते. तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष सुनीलदादा राऊळ आणि दूर्गसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला.
तर ठीक ८.०० वाजता हनुमंत गड येथून शिवज्योत व भगवा घेऊन मावळे यांनी दौड सुरू केली. ही दौड हनुमंत गड ते असनिये माऊली मंदिर ते प्रशाला अशी होती. शिवज्योत आणि भगवा घेऊन विद्यार्थी ठीक ९.०० वाजता शाळेत पोचले. त्यानंतर प्रशालेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला. शिव शिवजेत मंडळामार्फत निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वकृत स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा पार पाडत त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समन्वय समिती सदस्य महादेव सावंत हे अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून माजी सभापती पं. स. सावंतवाडीचे भगवानराव देसाई, नंदकुमार नाईक, स्वामीसेवक विजयदादा गावकर, पोलीस पाटील विनायक कोलापटे, प्रसिद्ध नाट्य कलाकार दादा कोनास्कर, कोणशी सरपंच साधना शेट्ये, असनीये उपसरपंच साक्षी सावंत, सदस्य संजय सावंत, तांबुळी सरपंच उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष सुनीलदादा मनोहरराव राऊळ हे उपस्थित राहिले होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग

