मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच योगासनांवर भर द्यावा : दत्ताराम सडेकर
मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे निबंध लिखाण स्पर्धा संपन्न
सावंतवाडी : मुलांनी विद्यार्थीदशेपासूनच आरोग्याची गुरुकिल्ली म्हणुन पहाटे उठणे, व्यायाम व निरनिराळी योगासने करण्यावर भर दिला तर आपल्या देशाचे सुदृढ नागरिक बनतील असे प्रतिपादन दत्ताराम सडेकर यांनी मळगाव येथे केले.मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित दत्ताराम सडेकर प्रायोजित निबंध लिखाण स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबा मेडिकलचे गजानन धुरी, डॉ.समीर सडेकर, वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालिका स्नेहा खानोलकर उपस्थित होत्या. ही निबंध लिखाण स्पर्धा वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात पार पडली. ही स्पर्धा २०१४ पासून सातत्याने सुरू आहे. यावेळी डॉ. समीर सडेकर यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन करून पुन्हा मार्गदर्शनासाठी येण्याचे कबूल केले. तर गजानन धुरी यांनी वाचनालयाला मोलाची आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल आनंद देवळी, लिपिक सौ. मेस्त्री, सुभाष तोरसकर यांचे सहकार्य लाभले.
कोकण नाऊ / सावंतवाडी