कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सागर करांडे, हेमांगी कवी यांचा जल्लोष

एक संगीत संध्या चा हिंदी, मराठी गाण्यांचा सदाबहार नजराना
टीव्ही, सिनेस्टार सह दिग्गज कलाकारांची उपस्थिती
11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवार 11 जानेवारी रोजी एक संगीत संध्या चा हिंदी मराठी गाण्यां चा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे, हेमांगी कवी यांच्यासह टीम लीडर शशांक कल्याणकर यांच्यासह नचिकेत देसाई, के शिरीष, मनीषा जांबोटकर, अंशिका चोंनकर, अबोली गिरे, आर जे अमित, वंदना पांचाल यांच्या हिंदी मराठी गाण्यांचा सदाबहार नजराणा या महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
या महोत्सवाची तयारी जोरदार सुरू असून अजून, दिग्गज कलाकार या महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना अनुभवता येणार आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली





