पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.6 जानेवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर (मोपा) विमानतळ, गोवा येथे आगमन व देवगडकडे प्रयाण.
सकाळी 10.30 वाजता देवगड येथे आगमन व पत्रकार दिन व राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ : दर्पण सभागृह, आचार्य बाळकृष्ण जांभेकर स्मारक प्रकल्प, पोंभुर्ले (जांभे- देऊळवाडी) ता. देवगड जि.सिंधुदुर्ग.)
दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन व जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कारचे वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: आद्यक्रांतीकारक बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी.)
दुपारी 3 वाजता जिल्हा कारागृह, सिंधुदुर्ग येथे भेट.
दुपारी 4 वाजता डिगस येथे आगमन व मठ- पणदूर-घोडगे रस्ता शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
सायं.5.30 वाजता मिलाग्रीस हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती.
सायं. 6.15 वाजता ओटवणे, ता. सावंतवाडी , ओटवणे ग्रामपंचायतच्या नुतन इमारतीचे उद्घाटन.
सायं. 7 वाजता सावंतवाडी येथून मनोहर (मोपा) विमानतळ, गोवाकडे प्रयाण.





