संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न

८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराजांची ३९९ वी जयंती मोठ्या उत्साहात वायरी भूतनाथ येथील तेली समाज बांधवांनी नुकतीच साजरी केली.
यावेळी संत श्रेष्ठ आणि संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे लेखनिक, त्यांच्या गाथा पुनर्जीवित करणारे थोर संत, समस्त तेली समाजाचे मानबिंदू म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेले श्री संताजी महाराज जगनाडे (सदुंबरे) यांची जयंती वायरी येथील श्री आनंद बांबार्डेकर यांच्या घरी साजरी केली गेली. समाजातील ज्येष्ठ नागरिक मा. रमाकांत पाटकर आणि वायरी उपसरपंच सौ प्राची माणगांवकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले गेले. श्री संताजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रास्ताविक श्री. दादा वेंगुर्लेकर आणि त्यांच्या जीवनावरील समग्र माहिती श्री. महादेव उर्फ भाऊ तळवडेकर यांनी सांगितली. शेवटी प्राणी मित्र श्री.आनंद बांबार्डेकर यांनी आभार मानले.
या जयंतीला तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री आनंद बांबार्डेकर, ज्येष्ठ नागरिक मा. रमाकांत पाटकर, दादा वेंगुर्लेकर, महादेव उर्फ भाऊ तळवडेकर, पराग माणगांवकर, गुरुदास तळवडेकर, प्रसाद डीचवलकर, तात्या तळवडेकर, सर्वेश पाटकर, प्रतीक डीचवलकर, बंड्या माणगांवकर, वल्लभ पाटकर, उदय पाटकर, अभय पाटकर तसेच महिलांमध्ये मीना मनोहर पाटकर, अर्चना तळवडेकर, प्रिया पाटकर, सुहासिनी पाटकर, सरिता पाटकर, आरती बांबार्डेकर, शारदा पाटकर, उर्मिला माणगांवकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, मोक्ष पेडणेकर, अमृता बांबार्डेकर, माही बांबार्डेकर, इ. स्थानिक उपस्थित होते.