अखेर कणकवलीतील “तो” बॅनर हटवला


नगरपंचायत प्रशासनाची कारवाई

बॅनर हटवल्यानंतर आता संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष

कणकवली : शहरात खासदार संजय राऊत यांच्या स्वागता पूर्वी युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक यांनी लावलेला व लावल्यापासूनच चर्चेत आलेला ” इलाका तेरा धमाका मेरा” हा बॅनर अखेर कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत नगरपंचायत प्रशासनाने हटवला. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. आज दुपारी हा बॅनर लावल्यानंतर हा बॅनर चर्चेत आला होता. कणकवलीत लावलेला हा बॅनर हटवल्याने आता शिवसेना फायर ब्रँड नेते संजय राऊत टार्गेट वर कोण असणार याची याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तसेच या बॅनरच्या कारवाईबाबत संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!