वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप

गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी वारगाव गावचे उपसरपंच आणि शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तिमत्व नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले,यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री. बाळा जठार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, चिंचवली सरपंच श्री.अशोक पाटील,पोलीस पाटील श्री. दिगंबर भालेकर ग्रामपंचायत सदस्या सौ. विद्या पांचाळ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.साक्षी भालेकर, उपाध्यक्षा सौ. प्रियांका खोत, चिंचवली गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. श्रीकांत भालेकर,श्री.रघुवीर भालेकर,श्री.तुकाराम गुरव* आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांची आवश्यकता असून लोकसभागातून हे गणवेश उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती शाळेच्या वतीने श्री. सूर्यकांत भालेकर यांना करण्यात आली होती. त्यांनी श्री. नाना शेट्ये यांच्याकडून हे गणवेश शाळेला प्राप्त करून दिले. शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता पवार यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या शैक्षणिक उठावासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल श्री. सूर्यकांत भालेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून श्री. नाना शेट्ये यांच्या दातृत्वाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी शाळेत कार्यरत खारेपाटण हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. योगिनी रानडे,पालक श्री. मंगेश सुतार, सौ.दीक्षा पांचाळ, सौ.श्रेया पांचाळ ,सौ. मानसी कांबळे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री. अमोल भंडारी यांनी केले नवीन क्रीडा गणवेशांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!