राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांचे कणकवलीत मार्गदर्शन

समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी कणकवली येथे उपस्थित राहत

सिंधुदुर्गातल्या सेविकांचे एकत्रीकरण करत मार्गदर्शन केले.

कणकवली : कणकवली येथील जानवली पुलाजवळ हॉटेल बावर्ची येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन,
स्वागत आणि परिचय,वैयक्तिक पद्य ,प्रात्यक्षिक ,सांघिक पद्य , राष्ट्रसेविका समिती, सिंधुदुर्ग, स्थापना, वाटचाल याविषयीचे चित्रफीतदर्शन व त्यानंतर शांताक्काजींचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते यावेळी शांताक्काजी यांनी उपस्थित सेविकांच्या शंकाचे निरसन केले.

यावेळी जिल्हा कार्यवाहीका सौ. मालती काळे व जिल्हा सहकार्यवाहीका सोनाली चन्ने तसेच राष्ट्रसेविका समिती गोवा येथील प्रांत संपर्कप्रमुख विजू ताई उमर्ये आणि राजश्रीताई जोग उपस्थित होते.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!