जान्हवीबाई माफी मागा, नाहीतर धिंड काढू !

जान्हवी सावंत यांची मोदींबद्दल शिवराळ भाषा
भाजप महिला मोर्चा संतप्त
निलेश जोशी। कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जाहीर सभेतून शिवराळ भाषा वापरणाऱ्या उबाठा सेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांच्याबद्दल भाजप महिला मोर्चाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जान्हवीबाई माफी मागा अन्यथा धिंड काढू असा इशाराच भाजपच्या प्रदाईश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे यांनी दिला आहे. जान्हवी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही सौ. तेरसे यांनी संगितलं. कुडाळ इथं त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.सध्या तेरसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सौ. प्रज्ञा राणे, विशाखा कुलकर्णी,मुक्ती परब, रेखा काणेकर, साधना माडये, सौ. रेवती राणे आदि उपस्थित होत्या.
यावेळी सौ. तेरसे म्हणाल्या की, जान्हवी सावंत यांना स्वतःच्या गावात एकही जागा ग्रामपंचायत मध्ये निवडुन आणण्याची लायकी नसणार्या बाईला स्वतःला सुषमा अंधारे यांच्या जागेवर नेऊन ठेवण्याची इच्छा आहे. जान्हवी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहिर माफी मागीतलीच पाहिजे अन्यथा त्यांची भाजपा महिला आघाडीच्या वतीने जाहिर धिंड काढली जाईल. स्त्रीवाचक शिवराळ भाषा त्यांनी उबाठा मेळाव्यात वापरली. ही भाषा वापरून त्यांनी समस्त स्त्री जातीचा अपमान केला तसेच अटकेपार पोहोचलेल्या सुसंस्कृत मालवणी भाषेचा अपमान केला आहे.
देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या विषयी त्यांनी असभ्य भाषा वापरली हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला तसेच मातृत्वाला शोभनीय नाही. गेली ९ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले कुटूंबप्रमुख म्हणुन काम करत आहेत. तरी पण एक महिला असुन तसेच स्वतःला सुसंस्कृत मानणार्या जान्हवी सावंत यांच्याकडुन अशी भाषा बोलणे अपेक्षित नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य शेतकर्यांसाठी पीक विमा योजना सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्या शेतकर्यांना विचारा, आजारपणात आधार मिळालेल्या लाभार्थीला विचारा, शौचालयाच्या लाभार्थ्यांना विचारा, सर्व योजना महिलांचा सन्मान व्हावा यासाठी काढल्या गेल्या आहेत. तरी सुध्दा स्वतः एक स्त्री असताना ही महिला अशा प्रकारे पंतप्रधानांना शिवराळ भाषा वापरते. अशा जान्हवी सावंतची यांची आम्हाला किव वाटते.
अशा असभ्य शिवराळ भाषेमुळे जान्हवी सावंत यांनी सिंधुदुर्गची मान शरमेने खाली घातली आहे. पंतप्रधान मोदी यांना एकेरी शब्द वापरते हे योग्य नाही,अशी भाषा वापरुन त्यांनी सिंधुदुर्गचा सन्मान कमी केला आहे. या शिवराळ भाषेबद्दल आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत आहोत. कुणी कितीही काही बोलले तरी मोदीच पंतप्रधान राहणार आहेत हे जान्हवी सावंत यांनी लक्षात ठेवावे. तसेच सन 2024 मध्ये सिंधुदुर्ग- रत्नागिरीचा खासदार भाजपचा असेल असा विश्वास यावेळी सौ. तेरसे यांनी व्यक्त केला.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





