सिंधूरत्न समृद्धी योजनेतुन  पर्यायी इंधन नौका इंजिन साठी अनुदान द्या 

भाजपा मच्छीमार सेलची सिंधुरत्न सदस्य प्रमोद जठार यांचेकडे मागणी

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग :  नौकाना वापरण्यात येणाऱ्या आउटबोट मशीनसाठी पेट्रोल हे इंधन म्हणून वापरले जाते. इंधनाचे वाढते दर यामुळे मत्स्य व्यवसायामध्ये मोठा खर्च इंधनावर होतो. त्याचा थेट परिणाम मच्छीमारास अथवा पर्यटन व्यवसायिक याना मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो. सध्या पर्यायी इंधन म्हणून गॅस इंधनाची चाचणी यशस्वी झालेलं आहे. पण त्यासाठी ४० हजार रुपये खर्च असल्याने सिंधुरत्न योजनेतून शासनाने मच्छीमार व पर्यटन नौकासाठी अनुदान द्यावे   अशी मागणी  भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रवीकिरण तोरसकर यांनी सिंधूरत्न समृद्धी योजनाचे सदस्य माजी आमदार प्रमोदजी जठार यांच्याकडे  केली आहे. 
       मत्स्य व्यवसाय खात्याने नुकतेच मच्छीमारांसाठी पर्याय इंधन म्हणून गॅसवरील इंजिनची मासेमारी लोकांसाठी चाचणी घेतली होती. सदरच्या चाचण्या मालवण व देवगड बंदर या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या. सद्यस्थितीत नौकाना वापरण्यात येणाऱ्या आउटबोट मशीनसाठी पेट्रोल हे इंधन वापरले जाते .इंधनाचे वाढते दर यामुळे मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या खर्च इंधनावर होतो. त्याचा थेट परिणाम मच्छीमारास अथवा पर्यटन व्यवसायिक याना मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो. गॅसवरील इंजिन मुळे इंधनावरील खर्च सुमारे  ६० टक्क्यापर्यंत कमी होणार आहे.  तसेच सागरी प्रदूषणामध्ये पण घट होणार आहे . सद्यस्थितीत वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलवरील इंजिनचे गॅस मध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे ४०  हजार रुपये खर्च आहे .यासाठी शासनाने मच्छीमार व पर्यटन नौकासाठी अनुदान द्यावे   अशी मागणी  भाजपा मच्छीमार सेलने सिंधूरत्न समृद्धी योजनाचे सदस्य माजी आमदार प्रमोदजी जठार यांच्याकडे  केली आहे. 
     मोरयाच्या धोंडा येथे शासकीय पूजेनिमित्त मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार जठार यांनी सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ मत्स्य आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. दांडी येथे झालेल्या मच्छीमारांच्या बैठकीमध्ये सिंधूरत्न समृद्धी योजनेअंतर्गत रापणकरांच्या जाळ्यांसाठी विशेष अनुदान योजना राबवण्याची ,तसेच मासेमारी लोकांचीसाठी असलेली बंदावस्थेतील योजना पुनर्रचित करण्याची मागणी उपस्थित मच्छीमारांमधून केली गेली. याबाबत सुद्धा माजी आमदार प्रमोद जठार यांनी अनुकूलता दर्शवली.
     यावेळी अशोक तोडणकर, रमेश तोडणकर,  भाऊ मोरजे,  भाई ढोके, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,  बाबा मोडकर,अवि सामंत, सुधीर जोशी, प्रमोद खवणेकर, बाबू जोशी, दामू तोडणकर, जयमाला मयेकर व इतर मच्छिमार उपस्थित होते. 

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!