अवकाळी पावसामुळे भातशेतीला फटका विद्यूत मंडळाचेही मोठे नुकसान

कलम ,काजू बागायतदार धास्तावले

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा परीसरात शनिवारी रात्री वादळीवारयासह गडगडाट करत आलेल्या मुसळधार पावसाने भात,नाचणीशेतीचे मोठे नुकसान केले. विद्यूत मंडळालाही याचा फटका बसला. त्रिंबक येथील विद्यूत मंडळाच्या मुख्य लाईनचे पोल मोडून पडल्याने आजूबाजूच्या गावातील विद्यूत पुरवठा सुमारे एकवीस तास खंडीत होता.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास आकस्मित आलेल्या वादळीवारयासह अवकाळी पावसामुळे आचरा परीसरात त्रेधातिरपीट उडवली. आकस्मिक आलेल्या पावसामुळे डोंगरेवाडी मळेभागातील भातशेती पाण्याखाली गेली होती. भरड भागातील नाचणीपीकही आडवे पडून नुकसान झाले आहे. काहीठिकाणी गवताच्या गंजी भिजून गेल्या आहेत. त्रिंबक येथील मुख्य विद्यूत लाईनचेपाच पोल मोडून पडल्याने त्रिंबक, चारीवडे,कोईळ,बांदिवडे, या भागातील विद्यूत पुरवठा रविवारी सायंकाळी सुरु झाल्याची माहिती विद्यूत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांनी दिली.

error: Content is protected !!