प्रतिबंधित पान मसाला, सुगंधीत तंबाखू साठवण विक्री प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखुची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी येथील तुषार मंगेश कोरगांवकर व विजय दिगंबर कोरगांवकर यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारुका यानी प्रत्येकी १५ हजार रुपयाचा सार्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी शहरातील मुख्य चौकातील तुषार कोरगांवकर रा. आशिये व विजय कोरगांवकर रा. कणकवली यांच्या स्टॉलवर गुप्त माहितीच्या आधारे छापा घातला असता सुमारे ४४ हजार ५९३ रुपयांचा पानमसाला व सुगंधीत तंबाखु (गुटखा) आढळून आला होता. असुरक्षीत प्रतिबंधीत अन्न पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याबद्दल दोघांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भादंवि कलम ३२८ १८८ २७२ २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांनाही २० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपताच आरोपीच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सार्थ जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश देतानाच पुराव्यात ढवळाढवळ करू नये व गुन्ह्याचे कृत्य पुन्हा करू नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!