अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादीची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केले मार्गदर्शन

राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचे काम करण्यात येणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या तालुका व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक गावपातळीवर तुम्ही कामाला लागा, पक्षाकडून लागणारे पाठबळ तुम्हाला निश्चित स्वरूपी देण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कणकवलीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर व शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी कार्यकारिणी जाहिर करण्यासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण आदी उपस्थित होते.
काका कुडाळकर यांनी संघटना मजबूतीसाठी सर्वांनी प्रयत्न करूया. तुमच्या अडीअडचणी असतील तर जिल्हाध्यक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. आपण व जिल्हाध्यक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी निश्चित केलेल्या कार्यकारिणीला मान्यता देण्यात आली. तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी तालुक्यातील आठही जि.प. मतदारसंघात जाऊन दौरा करून गावनिहाय पदाधिकारी जाहिर करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, सरचिटणीस अनिस नाईक, शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, चिटणीस गणेश चौगुले, खजिनदार विशाल पेडणेकर, दिपेश सावंत, विराज बांदेकर, सुधाकर ढेकणे, राजेंद्र पिसे, प्रशांत कोचरेकर, महेश चव्हाण, मुश्ताक काझी, सलिम शेमणा, किशोर घाडीगांवकर, सुधाकर कर्ले, बंड्या ढेकणे, भाई डंबे, जहिर फकीर, अंकुश मेस्त्री, संजय पवार, दिगंबर सावंत, शामसुंदर राणे, विद्याधर घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका उपाध्यक्षपदी सत्यविजय परब, सुधाकर ढेकणे, राजेंद्र पिसे, प्रशांत कोचरेकर, संतोष गांवकर यांची नियुक्ती करण्यात आली. सरचिटणीसपदी किशोर घाडीगांवकर, संतोष मेस्त्री, चिटणीसपदी मुश्ताक काझी, खजिनदारपदी विजय वर्दम तर पदविधर मतदारसंघ अध्यक्षपदी महेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. कणकवली शहर उपाध्यक्षपदी अमित केतकर, सरचिटणीसपदी अनिस नाईक, चिटणीसपदी गणेश चौगुले, खजिनदारपदी विशाल पेडणेकर, शहर प्रतिनिधीपदी सचिन अडुळकर व निशिकांत कडुलकर व इतर प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!